मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एका भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना घडली आहे. सुप्रिया सुळे पुण्यातून मुंबईकडे येत असताना गुजरात पासिंगच्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिली. समोरच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अनुभव अत्यंत भयानक होता, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही आणि कारमधील सर्व सदस्य सुरक्षित आहेत.
हे ही वाचा
या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सीटबेल्टचा वापर करावा, असे कळकळीचे आवाहन केले आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

0 Comments