मुंबई
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या पोलीस सेवेतील धडाकेबाज कामगिरीमुळे "लेडी सुपरकॉप" अशी ओळख निर्माण करणाऱ्या मीरा बोरवणकर यांच्यावर आता राज्यातील महिलांच्या हक्कांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी काही वादांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते, ज्यावर आता बोरवणकर यांची वर्णी लागली आहे.
हे ही वाचा
१९८१ च्या बॅचच्या वरिष्ठ अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक जटिल गुन्हेगारी प्रकरणे धडाडीने हाताळली असून, महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाच्या कामकाजात अधिक स्पष्टता आणि कडक शिस्त येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महिला सुरक्षा, हक्क आणि सक्षमीकरणासाठी त्या ठोस पावले उचलतील, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्यातील महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी निश्चितच होईल.

0 Comments