श्रीरामपूर
श्रीरामपूर शहरात सध्या रामनवमी उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आज शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरील श्रीराम मंदिर चौकात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने तरुणाच्या मानेवर वार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचा मोठा फौजफाटा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भवर आणि पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला प्रथमतः साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीची गंभीरता पाहून त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी तरुणाचे नाव राशीनकर असून तो बेलापूर येथील रहिवासी असल्याचे समजते. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

0 Comments