रत्नागिरी
कोकणच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीत गेलेल्या मुंबईतील एका व्यापारी कुटुंबाला भीषण अनुभवाचा सामना करावा लागला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध आरे-वारे सागरी किनारा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी या कुटुंबाची कार अडवून त्यांना बेदम मारहाण केली. "तुमच्या गाडीचा नंबर पाहिलाय, तुम्हाला बघून घेतो" अशा शब्दांत आरोपींनी या पर्यटकांना धमकावून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. सहकुटुंब पर्यटनासाठी आलेल्या या व्यापाऱ्यांच्या गाडीला रस्त्यातच अडवून अचानक ही मारहाण करण्यात आली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे ही वाचा
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत अशा प्रकारे पर्यटकांवर हल्ला झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

0 Comments