MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

५००० रुपयांसाठी ८ वर्षे लढले; अखेर ग्राहकाच्या बाजूने निकाल, बँकेला भरावा लागला मोठा दंड!


नागपूर

नागपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने सेवा पुरवण्यात झालेल्या त्रुटीबद्दल ॲक्सिस बँकेला चांगलेच धारेवर धरले असून एका ग्राहकाला १० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात एटीएममधून पैसे न मिळताही संबंधित ग्राहकाच्या खात्यातून ५ हजार रुपये डेबिट झाले होते. खात्यातून रक्कम कापली गेल्यानंतरही ग्राहकाला रोख रक्कम न मिळणे हे बँकेच्या सेवेतील गंभीर त्रुटी असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले. बँकेची ही नैतिक जबाबदारी आहे की अशा तांत्रिक बिघाडांची तातडीने दखल घेऊन ग्राहकाला दिलासा मिळावा, मात्र या प्रकरणात बँकेने ग्राहकाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि लोकपाल प्रक्रियेतही योग्य भूमिका बजावली नाही. १९ ऑगस्ट २०१८ रोजी घडलेल्या या घटनेनंतर संबंधित ग्राहकाने अनेकदा पाठपुरावा करूनही बँकेने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. इतकेच नाही तर ग्राहक आयोगाच्या नोटीसकडेही बँकेने दुर्लक्ष केले, ज्यामुळे आयोगाला एकतर्फी निकाल द्यावा लागला. ग्राहकाच्या खात्यातून पैसे कापले गेल्याचे सिद्ध होऊनही बँक सबळ पुरावे सादर करू शकली नाही, त्यामुळे बँकेला आता मूळ रकमेसह १० हजार रुपयांचा दंड भरवा लागणार आहे.


Post a Comment

0 Comments