पुणे
पुण्यातील प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून हे मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, भाजपचे झारखंडमधील खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर विशेषतः उघडून त्यांना 'व्हीआयपी दर्शन' घडवून आणल्याचा आरोप होत आहे. एका बाजूला सामान्य नागरिक दर्शनासाठी आसुसलेले असताना आणि त्यांना प्रवेश नाकारला जात असताना, राजकीय नेत्याला मात्र ही विशेष सोय कशी काय मिळते, असा संतप्त प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारासाठी प्रशासनाने नियमात शिथिलता दाखवल्याने स्थानिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

0 Comments