राहुरी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' (ऑनर्स कॉझा) ही मानाची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याची आणि आधुनिक धोरणांची दखल घेऊन विद्यापीठाने हा विशेष सन्मान दिला आहे. फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत, ज्याचे फळ म्हणून ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे. या सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Comments