MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

नितेश राणेंचे पुन्हा एकदा प्रक्षोभक विधान: कुंभमेळ्यात मुस्लिम स्टॉल हटवण्याचा इशारा


नाशिक

नाशिकमधील आनंदवल्ली येथे आयोजित 'हिंदूंचा रुपया हिंदूंनाच' या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून आक्रमक भूमिका मांडली आहे. सकल हिंदू समाजाच्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी हिंदू व्यावसायिकांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन केले. नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, हे हिंदू राष्ट्र असून येथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांचे स्टॉल नसावेत आणि असे स्टॉल आढळल्यास ते उखडून टाकावेत, अशी चिथावणीखोर भाषा त्यांनी वापरली. तसेच, आगामी काळात धर्मांतरविरोधी आणि लव्ह जिहादविरोधात कडक कायदा आणला जाईल, असा दावा करत त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात अत्यंत प्रक्षोभक विधाने केली आहेत.


Post a Comment

0 Comments