क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. या हंगामाचा सलामीचा सामना २८ मार्च रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २० सामन्यांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे अनेक महत्त्वाचे सामने समाविष्ट आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने केवळ सुरुवातीच्या टप्प्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून उर्वरित सामन्यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत १० शहरांमध्ये सामने होणार असून दुपारचे आणि संध्याकाळचे असे 'डबल हेडर्स' सामने चाहत्यांचे मनोरंजन करतील.
आयपीएल २०२६ चे वेळापत्रक जाहीर, सलामीचा सामना रंगणार बंगळुरूमध्ये

0 Comments