मुंबई
राज्य रस्ते मार्ग महामंडळाच्या (एसटी) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटीच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
हे ही वाचा
- इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी ५२५ कोटी मंजूर
- इंधन आणि गॅस टंचाईवरून संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात
- ५००० रुपयांसाठी ८ वर्षे लढले; अखेर ग्राहकाच्या बाजूने निकाल, बँकेला भरावा लागला मोठा दंड!
या बैठकीत 'सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा'च्या पदाधिकाऱ्यांनी चालक-वाहकांवरील कारवाई, आगार व्यवस्थापनातील अडचणी आणि काही प्रशासकीय प्रक्रियांच्या समस्या मांडल्या होत्या. संघाचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेत सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. तसेच, तीन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर ठिकाणी करण्याबाबतही एसटी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर हे देखील उपस्थित होते.

0 Comments