मुंबई
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर सध्या त्यांच्या एका खळबळजनक विधानामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत. साऊथचा सुपरस्टार थलपती विजय याने राजकारणात प्रवेश केल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत असतानाच, सचिन पिळगावकर यांनी या राजकीय प्रवासाचा एक वेगळा पैलू उघड केला आहे. एका मुलाखतीत बोलताना सचिनजींनी सांगितले की, त्यांचे आणि विजयचे सिनेसृष्टीतील संबंध खूप जुने आणि जिव्हाळ्याचे आहेत. इतकेच नाही तर थलपती विजयला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा सल्ला स्वतः त्यांनीच दिला होता, असा दावाही त्यांनी केला आहे.
हे ही वाचा
राजकारणातील बारकावे आणि डावपेच आपणच त्याला समजावून सांगितल्याचे सचिन पिळगावकर यांनी म्हटल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन दिग्गज कलाकारांमधील ही मैत्री आणि त्यातून घडलेली ही राजकीय घडामोड सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

0 Comments