मुंबई
मीरा-भाईंदरमधील काशीमीरा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक अश्वारूढ पुतळ्याच्या डागडुजीवरून आता सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप आमनेसामने आले आहेत. महानगरपालिकेने पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी तो हटवण्याचा प्रस्ताव मंजूर केला असला, तरी त्यात 'स्थलांतर' या शब्दाचा उल्लेख केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, परिसरातील शॉपिंग मॉलच्या फायद्यासाठी ३० वर्षे जुना पुतळा हटवण्याचे कारस्थान रचले जात आहे. मनसेने देखील या वादात उडी घेत पुतळ्याला धक्का लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा
दुसरीकडे, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, केवळ पुतळ्याला गेलेल्या तड्यांमुळे दुरुस्तीचे काम हाती घेतले असून काम पूर्ण झाल्यावर पुतळा पुन्हा त्याच जागी सन्मानाने बसवला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या संदिग्ध भूमिकेमुळे स्थानिक शिवप्रेमींमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे.

0 Comments