MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

नागपुरातून चालणाऱ्या बनावट नोटांच्या छापखान्याचा गडचिरोली पोलिसांकडून पर्दाफाश; ४ आरोपी गजाआड, साहित्य जप्त!

नागपुरातून चालणाऱ्या बनावट नोटांच्या छापखान्याचा गडचिरोली पोलिसांकडून पर्दाफाश

गडचिरोली

गडचिरोली पोलिसांनी नागपुरातून चालणाऱ्या बनावट नोटा छापणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम कॅश डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा जमा करणाऱ्या एका आरोपीला पकडल्यानंतर या मोठ्या घोटाळ्याचा उलगडा झाला. पोलिसांनी नागपूरच्या त्रिमूर्ती नगरमधील एका फ्लॅटवर छापा टाकून हाय-टेक कलर प्रिंटर, कॉम्प्युटर, बॉण्ड पेपर आणि अर्धवट छापलेल्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली असून, हे रॅकेट कुठे-कुठे पसरले आहे याचा तपास पोलीस करत आहेत.


हे ही वाचा


Post a Comment

0 Comments