मुंबई
शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रोच्या 'लाईन ३' म्हणजेच 'एक्वा लाईन'वर मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे मेट्रो सेवा तब्बल ४० ते ५० मिनिटे विलंबाने धावत होती. ऑफिसला जाण्याच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आणि प्रवाशांचे हाल झाले. प्रशासनाने आता हा बिघाड दुरुस्त करून सेवा पूर्ववत केली असली, तरी महिनाभरात मेट्रो सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ असल्याने प्रवाशांनी सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा

0 Comments