MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

मुंब्र्यात विनयभंगाच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

मुंब्र्यात विनयभंगाच्या वादातून गोळीबार, एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

ठाणे

ठाण्यातील मुंब्रा परिसरात गुरुवारी गुन्हेगारीची एक थरारक घटना समोर आली आहे. विनयभंगाच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर गोळीबारात झाले असून, यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांसह मुंब्रा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

ही घटना मुंब्रा बायपास जवळील सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक शाळेजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय जयन शिवानंदन नायर याने त्याच्या मानलेल्या बहिणीसोबत झालेल्या कथित विनयभंगाच्या वादातून रागाच्या भरात सुमारे ५ राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात अकबर अब्दुल शेख, अब्दुल हसन शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कळसेकर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख याचा मृत्यू झाला.


हे ही वाचा

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश


कैलास नगर भागातील बिस्मिल्ला चाळीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी जयन नायर याने गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता, परंतु मुंब्रा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे त्याला गुन्ह्यात वापरलेल्या शस्त्रासह अटक केली आहे. या घटनेमागे नक्की काय कारण होते आणि हा वाद इतक्या टोकाला कसा गेला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments