मुंबई
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणाने आता राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे. रूपाली चाकणकर यांच्यानंतर आता या प्रकरणात दुसरी मोठी 'विकेट' पडली असून, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातने महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. शिर्डी येथील समता नागरी पतसंस्थेत खरातचे वारसदार असलेली शंभरहून अधिक संशयास्पद खाती आढळल्याने ही संस्था अडचणीत आली होती. यामध्ये रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरील खात्यांचाही समावेश आहे, ज्यातून दोन कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
हे ही वाचा
या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आणि सभासदांच्या वाढत्या दबावामुळे, १५ हजार पतसंस्थांचे जाळे असलेल्या फेडरेशनचे २०१५ पासून नेतृत्व करणाऱ्या काका कोयटे यांनी अखेर पदत्याग केला आहे. दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळत आपली स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा केला असून शिर्डी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

0 Comments