MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; 'महेशगिरी'वर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश

नाशिक 

नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीचे सत्र थांबताना दिसत नाहीये. अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच आता निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदूबाबाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या कौटुंबिक समस्या आणि मानसिक तणावाचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबांच्या जाळ्यात सुशिक्षित वर्गही अडकत असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील एका २८ वर्षीय पीडित महिलेचे दोन विवाह झाले होते, परंतु दोन्ही अयशस्वी ठरले. मानसिक नैराश्यात असलेल्या या महिलेला तिचे आई-वडील धारणगाव येथील 'प्रतिगाणगापूर' मठात घेऊन गेले. तिथे असलेला ३१ वर्षीय भोंदू महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे याने स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचे भासवले. महिलेला 'करणी' झाली असून ती काढण्यासाठी काही विधी करावे लागतील, असे सांगून त्याने तिला जाळ्यात ओढले.


हे ही वाचा


इतक्यावरच न थांबता या भोंदूने महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. "तू मला आवडतेस, लग्न करू नकोस आणि माझा मठ चालव" असे म्हणत त्याने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments