श्रीरामपूर
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास श्रद्धा चंद्रकांत पुजारी ही तरुणी दुचाकीवरून घरी परतत असताना, केशव गोविंद मंदिर परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात श्रद्धा गंभीररीत्या जखमी झाली असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तिला तातडीने उपचारांसाठी प्रथम श्रीरामपूर आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने परिसरात वर्दळ होती, त्यामुळे श्रद्धाचा आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले.
वारंवार मागणी करूनही वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला नाही, त्यामुळेच ही वेळ ओढवल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या संपूर्ण बेलापूर परिसरात भीतीचे सावट पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

0 Comments