MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्सप्रेसला आग; नामपल्ली स्टेशनवर प्रवाशांची धावपळ

हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्सप्रेसला आग

हैदराबाद 

हैदराबाद येथील नामपल्ली रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी हैदराबाद-जयपूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ट्रेनच्या थ्री-टियर एसी कोच बी-१ आणि बी-२ मधून अचानक आगीच्या ज्वाला उठू लागल्याने संपूर्ण स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


हे ही वाचा

NEET परीक्षा रद्द करा, १२वीच्या गुणांवरच द्या प्रवेश; मुख्यमंत्री विजय यांची रोखठोक भूमिका


ही घटना ट्रेन संध्याकाळी ७ वाजता जयपूरसाठी रवाना होण्याच्या काही वेळ आधी घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला डब्यांमधून प्रचंड धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच प्रवाशांनी आपले सामान जागेवरच सोडून सुरक्षित दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल, स्टेशन प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली असून, आग लागली तेव्हा डब्यात किती प्रवासी होते याचा तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments