उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये एक अत्यंत भीषण बस अपघात झाला आहे. गाझीपूर-बलिया राष्ट्रीय महामार्गावर ५० प्रवाशांनी भरलेली एक खाजगी बस थेट ३० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उलटली. ट्रॅफिक जॅममधून गाडी काढण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढले. सध्या सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा

0 Comments