बिहार
बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे दोन मुलांच्या आईने आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आहे. हवेली खडकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पश्चिम अजीमगंजमध्ये राहणाऱ्या शिवानी कुमारीने २७ मार्चच्या रात्री घराशेजारी राहणाऱ्या विशाल नावाच्या तरुणासोबत घर सोडले. या घटनेनंतर शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्पष्टपणे म्हटले आहे की, ती आपल्या मर्जीने विशालसोबत गेली असून तिला तिच्या पतीसोबत राहायचे नाही. तसेच, जर विशालच्या किंवा त्याच्या स्वतःच्या कुटुंबाला काही झाले, तर त्याला तिचा पती पवन आणि त्याचे कुटुंब जबाबदार असेल, अशी ताकीदही तिने दिली आहे.
हे ही वाचा
पवन आणि शिवानी यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरू होते. शिवानीने यापूर्वी पती आणि सासरच्या मंडळींवर छळाचे आरोपही केले होते. याच काळात तिचे शेजारी राहणाऱ्या विशालशी प्रेमसंबंध जुळले. पती पवनला याबद्दल कुणकुण लागल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शिवानीने टोकाचे पाऊल उचलत पोटच्या दोन मुलांना पतीकडे सोडून प्रियकरासोबत पळ काढला. पवनने याप्रकरणी खडकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सध्या हा संपूर्ण प्रकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

0 Comments