MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

नवगाव उंचेगाव शिवावर वाळू चोरांचा हैदोस; प्रशासनाची डोळे झाक

 


नवगाव प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील नवगाव हा अत्यंत समृद्ध भाग असून गोदावरीच्या कृपेने अत्यंत कृषी व्यवसायाला चालना मिळाली असून, याच गोदावरी नदीतील वाळूचा वाळू तस्कर अत्यंत दुरुपयोग करत असून रात्रंदिवस शेकडोग्रास वाळू चोरीच्या मार्ग मार्गाने गोदावरी नदीतून उपसा केले जात आहे नावगाव व आवडे उंचेगाव दोन्हीच्या मध्यभागी शिवावर हा वाळू उपसा सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. दररोज रात्री शंभर ते दीडशे हायवा गाडीच्या मदतीने या ठिकाणाहून वाळूचोरीला जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर वाळू उपसा होत असल्याची कुजबुज ऐकायला येत आहे. लाखो रुपयांचा गौण खजिना चोरीला जात असून याकडे असल्यासारखे महसुली अधिकारी वागताना दिसत आहे, शासकीय वाळू टेंडर झाल्याप्रमाणे वाळू तस्कर दिवस रात्र या ठिकाणाहून वाळू उपसा करत असताना दिसत आहे. ट्रॅक्टर यारी च्या साह्याने दिवसभर व रात्रभर वळून उपसा करून रात्रभर वाहतूक सुरू राहत आहे.




Post a Comment

0 Comments