आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले असून अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ऐतिहासिक कमाई केली आहे. रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसासाठी ५० कोटींहून अधिक रुपयांची तिकिटे विकली असून हा आकडा १०० कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट बॉलिवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरण्याची शक्यता असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सशुल्क प्रीमियर शोला मिळालेला प्रतिसाद पाहून अनेक शहरांमध्ये मध्यरात्रीचे शो देखील वाढवण्यात आले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम हा चित्रपट मोडीत काढू शकतो असे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा

0 Comments