MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

युट्युबर ध्रुव राठीच्या विधानाने नवा वाद; श्रीराम आणि श्रीकृष्णाबद्दलच्या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी आक्रमक


नवी दिल्ली

प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याच्या एका ताज्या विधानाने सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. एका युट्युब शो दरम्यान ध्रुव राठीने भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असून, श्रीराम आणि कृष्ण हे मांसहार करायचे तसेच मद्य प्राशन करायचे, असा दावा त्याने केला आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिक आक्रमक झाले असून ध्रुव राठीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

ध्रुव राठीने आपल्या दाव्याचे समर्थन करताना वेद आणि वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या 'ईस्ट अँड वेस्ट' या पुस्तकातील संदर्भांचा उल्लेख करत त्याने म्हटले की, रामायण आणि महाभारतात राम-कृष्ण मांस खात असल्याचे उल्लेख आढळतात. उद्योग पर्वातील ५८ व्या अध्यायाचा दाखला देत त्याने अर्जुन आणि कृष्ण मद्यसेवन करायचे, असेही नमूद केले. मात्र, या ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भांच्या त्याच्या अर्थावरून आता नवा वाद पेटला आहे. नेटकऱ्यांनी ध्रुव राठीवर सडकून टीका केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Post a Comment

0 Comments