MAIN QUOTE$quote=Steve Jobs

MAIN QUOTE$quote=Steve Jobs

हवाई प्रवास महागणार, एअर इंडियाकडून फ्युएल सरचार्ज लागू


नवी दिल्ली

आज १२ मार्चपासून एअर इंडियाने आपल्या घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर 'फ्युएल सरचार्ज' लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हवाई प्रवास महागणार आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे विमान कंपन्यांनी हा अतिरिक्त भार प्रवाशांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती प्रवासासाठी प्रवाशांना आता अतिरिक्त ३९९ रुपये मोजावे लागणार असून आंतरराष्ट्रीय मार्गावर हा दर आणखी जास्त असणार आहे. हवाई इंधनाचा वाटा एअरलाईन्सच्या एकूण खर्चात जवळपास ४० टक्के असल्याने कंपन्यांना हा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत असतानाच झालेल्या या भाडेवाढीमुळे पर्यटनाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.


Post a Comment

0 Comments